न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- लग्नाचे अमीष दाखवत पिडीत महिलेच्या इच्छेविरुद्ध आरोपीने वारंवर शारिरीक संबंध ठेवले. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात घडवून आणला. फिर्यादीसह मुलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. पिडीत फिर्यादी महिलेने आरोपीस फसवणुक का करत आहेस? असे विचारले असता त्याने फिर्यादीला लाथाबुक्याने पोटात मारले.
ही घटना (दि.२९/०६/२०१५ ते दि.२९/११/२०२२ पर्यंत) फिर्यादीच्या घरी चक्रपाणी वसाहत, भोसरी व मॅग्झीन चौक, दिघी आणि सांगवीतील लॉजवर घडला.
पिडीत महिलेने आरोपी करण ओमप्रकाश राजपुत (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.