- तरुणाकडून मुलीचा हात पकडून विनयभंग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२२) :- ” मी दगडु शेठ गणपतीला नवस केला आहे; मी जेव्हा नवीन बुलेट गाडी घेईन, त्यावेळी माझ्या गाडीवर प्रथम तुला बसवुन घेवुन येईल; तु माझ्या बरोबर चल ” असे आरोपी फिर्यादी तरुणीच्या शाळेत जाऊन म्हणाला. त्यावेळी फिर्यादीने आरोपीचा हात झटकुन ” तु माझ्या पाठीमागे येवु नको; मी शाळेच्या शिक्षकांना सांगेल ‘ असे आरोपीला सांगितले.
तेव्हा ” मी कुणालाही घाबरत नाही ” असे उलट आरोपी फिर्यादीला बोलला. तेवढ्यात फिर्यादीची मैत्रीण तिथे आली. तिच्यासमोर ” तु माझ्या बरोबर आली नाही तर, मी तुला पळवुन घेवुन जाईल ” अशी धमकी देत आरोपी तिथून निघुन गेला.
हा प्रकार (दि. २९) रोजी सकाळी ११:४० वा. नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी येथे घडला. महिला फिर्यादी हिने आरोपी आदित्य ऊर्फ सागर संजु जाधव (वय १९ वर्षे, रा. बालामन चाळ, नवमहाराष्ट्र शाळेजवळ, पिंपरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.