न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०२२) :- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील एक्सयुवकी ७०० च्या मटेरीयल स्टोअर रूममधुन एक्साईड कंपनीच्या व अमराराजा कंपनीच्या ४९ बॅट-या चोरटयांनी चोरून नेल्या. त्याची एकुण किंमत १,४७,०२८ एवढी आहे.
हा प्रकार (दि. २३/११/२०२२) सायं ६.०० वा ते (दि २/१२/२०२२) रोजी दुपारी ३.०० वा. निघोजे येथे घडला. फिर्यादी महेंद्र ज्ञानदेव घोरपडे (वय ४२ वर्षे, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी आरोपी विश्वनाथ भगवान कचरे (वय-२६. रा. अजिपुर, ता.लोनार, जि. बुलढाणा. सध्या रा. लक्ष्मी हॉटेलजवळ, सुभाषवाडी, निघोजे), दिपक नाना सपकाळ (वय-३६ वर्षे, रा. हातेड, ता. चोपडा, जि.जळगाव, सध्या रा. मोरेवस्ती, चिखली, टॉवरलाईन, मंगल यादव यांची रूम) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण (म्हाळुंगे) पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


















