न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जुलै २०२२) :- वाईन शॉपचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून २७,५०० रोकड आणि इतर माल असा एकुण ३२,५०० रु किंमतीचा माल चोरांनी चोरी करून नेला आहे.
ही घटना (दि. ४) रोजी रात्री २२.३० ते (दि. ५) रोजी सकाळी १०.१५ वा. दरम्यान उमेश वाईन, गवळीनगर, पुणे नाशिक रोड, पी.एम.टी.बस स्टॉप, भोसरी येथे घडली.
फिर्यादी सेवक गुरुदासमल अछरा (वय ६२ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए ४०१ अशीर्वाद अपार्टमेंट जगदंबा – स्वीट जवळ, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.