न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- बेकायदा लोखंडी कोयता जवळ बाळगून रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना आडवून आरोपीने शिवीगाळ केली. सार्वजनिक शांतता भंग होईल असे कृत्य केले.
तळेगाव दाभाडे पोलीसांनी (दि ८) रोजी दुपारी ४.४५ वा. गोळवनकर मैदान, शिवाजी चौक, तळेगाव दाभाडे येथून आरोपीला अटक केली. आरोपी वैभव रामकृष्ण विटे (वय २६ वर्ष, रा. जागृती चौक, तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे.


















