न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ डिसेंबर २०२२) :- बदनामी करण्याच्या उद्देशाने अज्ञात आरोपीने फिर्यादीसह त्यांच्या मैत्रीणीचे फेक इंस्टाग्राम अकाउंट तयार केले. त्यावर त्यांचा फोटो वापरुन त्यांच्याबाबत घाणेरडे शब्द असलेली स्टोरी पोस्ट तयार केली.
” randihanisaniya ” या नावाचा ग्रुप तयार केला. त्या माध्यमातून अश्लील मेसेज प्रसारित करुन फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. ही घटना (दि. ८) रोजी पहाटे ५.३५ वा. ते दुपारी ३.५२ वा च्या दरम्यान मोरवाडी कोर्ट, पिंपरी येथे घडली.
फिर्यादी महिलेने अज्ञात आरोपीविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


















