न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० डिसेंबर २०२२) :- काळुकाई मंदीरात फिर्यादी कुत्रा घेऊन बसले होते. त्यावेळी तिथे तीन अनोळखी इसम आले. ‘ तु या मंदीरात तुझ्याकडील कुत्रे घेवून यायचे नाही ‘ असे बोलून फिर्यादीला लाकडी काठीने व नारळाच्या झाडुने डाव्या हातावर मारहाण केली. हाताने गालावर जोरात झापड मारुन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ८) रोजी दुपारी २.०० वा.चे सुमारास काळुकाई मंदीर, नेरे दत्तवाडी ता. मुळशी येथे घडला. फिर्यादी अभिषेक सुरेंद्रकुमार भारद्वाज (वय ३५ वर्षे, रा. के/ऑफ सुनिल दशरथ अटपाडकर यांचे घर, बिल्डींग ए १४, रुम नं ७०१, एर्क्सबिया सोसायटी, नेरे दत्तवाडी) यांनी आरोपी तीन अनोळखी इसम (नाव पत्ता महित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली असून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


















