न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२२) :- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत पिंपरी येथे मंगळवारी मतदार नावनोंदणी शिबिर झाले. यात ५८ तृतीयपंथींनी मतदार यादीत नाव समावेश करण्यासाठी अर्ज सादर केले.
पुण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार आयोजन केले होते. पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालय, २०७ भोसरी विधानसभा मतदारसंघ तसेच महापालिका व अस्तित्व तृतीयपंथी देवदासी धर्मदाय संस्था रुपीनगर व प्लाइंग वुमेन फाउंडेशन चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर घेण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, अपर तहसीलदार गीता गायकवाड, भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी राणी ताटे, पांडुरंग पवार, राजेश आगळे, सीताराम बहुरे, संजय नाईकडे, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, महापालिकेचे अण्णा बोदडे, प्लाउंग वुमेन फाउंडेशनच्या अध्यक्ष छायावती देसले, अस्तित्व तृतीयपंथी देवदासी धर्मदाय संस्थेचे अध्यक्ष अमित म्हस्के, महसूल सहायक सुनील कास्टेवाड, सर्व मंडलाधिकारी व तलाठी उपस्थित होते.
शिबिरात तृतीयपंथींची मतदार नावनोंदणी व आधार नोंदणी करण्यात आली. यात नवीन मतदार नोंदणीसाठी तृतीयपंथींकडून ५८ अर्ज प्राप्त झाले. तृतीयपंथींना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मतदार नावनोंदणीसाठी जनजागृती आवश्यक असून, तृतीयपंथींनी त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
शिबिरात तृतीयपंथींची मतदार नावनोंदणी व आधार नोंदणी करण्यात आली. यात नवीन मतदार नोंदणीसाठी तृतीयपंथीकडून ५८ अर्ज प्राप्त झाले. तृतीयपंथींना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.


















