न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- कुदळवाडी परिसरात कचरा समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या भागात अनेक कामगार व्यापारी मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कचऱ्याची घंटागाडी सकाळी उशीरा येते; त्यावेळेस अनेक कामगार कामाला जातात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.
कामगार कामाला जाताना कचरा रस्त्यावर फेकतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो. सकाळी व संध्याकाळी कचरा गाडी या परिसरात सुरू करावी. त्यामुळे कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होईल. परिसर स्वच्छ होईल. नागरिक कचरा रस्त्यावर टाकणार नाहीत, अशी मागणी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पालिकेचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम बहुरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
















