- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विनय कुमार चौबे आता शहराचे नवे पोलीस आयुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची नाशिक शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे यांची पद उन्नत करून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच पुणे शहराचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांचीही बदली झाली असून अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार असणार आहेत.
मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील मोठा निर्णय आज मंगळवारी (दि. १३) रोजी घेतला आहे. आज राज्याच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
राज्य सरकारनं दिवाळीपूर्वीचं पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानुसार आज राज्यभरात १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशा चर्चा सुरु होत्या. अखेर आज पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
















