न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. ५) रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेते येणार आहेत. भोसरीमधील गावजत्रा मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे.
मेळाव्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर हा पहिला जाहीर मेळावा असून, कोल्हे यांच्याकडे स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.











