न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२२) :- लक्ष्मी एनर्जी ॲन्ड फ्युल पंपावर आरोपी काम करीत होते. त्यावेळी त्यांनी संगनमत करुन स्वतःच्या अर्थिक फायद्यासाठी स्वतःचा फोन पे क्युआर कोड वापरुन एकविस लाख पन्नास हजार रुपयाची आर्थिक फसवणुक करीत पैशांचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि १/८/२०२२) ते (दि. ८/११/२०२२) रोजीपर्यंत लक्ष्मी एनर्जी ॲन्ड फ्युल पंप, भोसरी येथे घडली. फिर्यादी गणेश सुरेश लांडगे (वय ३५ वर्षे, रा. पांडुरंग रेसीडेन्सी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी आरोपी वैभव बाळासो जाधव (रा. दिघी), रोहीत विजय माने (रा. सदगुरुनगर, भोसरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
















