न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२२) :- घरातील सोन्याचे टॉप, २ अंगठया, सोन्याची चैन, गंठन आणि रोख अडीच लाख असे एकूण ३,६०,००० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवुन आरोपी निघून गेला. दरम्यान ५ मिनिटांनी परत येवुन फिर्यादीच्या लहान मुलीला आरोपीने उचलून नेले.
फिर्यादीची पत्नीही त्याच्या मागोमाग जाताना दिसली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि.९/१२/२०२२) रोजी रात्री १०.१५ ते (दि.१०/१२/२०२२) रोजी सकाळी ८.३० वा. भैरवनाथ हौसींग सोसायटी, रुपीनगर, तळवडे येथे घडली.
फिर्यादी चेतन सुभाषराव केकाडे (वय ३०, रा. भैरवनाथ हौसींग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) यांनी राहुल हेगाडे (पुर्णनांव पत्ता माहित नाही) या आरोपी विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















