न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणे या संस्थेचे अध्यक्ष एन.डी. मारणे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये अखिल भारतीय सेवा निवृत्त वेतनधारक दिन अर्थात पेन्सनर्स डे साजरा करण्यात आला, त्यावेळी उपस्थित सेवानिवृत्तअधिकारी,कर्मचा- यांना मार्गदर्शन करताना मारणे बोलत होते.
यावेळी महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड, केंद्र , राज्य . शिक्षक रेल्वे , पोस्ट , पोलिस आदी सेवानिवृत्त संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, अमृत अबनावे,श्रीराम परबत गुरूजी, यशवंत चासकर, चंद्रकांत झगडे, विलास देसाई,राजेंद्र पाटील, नामदेव तारू, प्रल्हाद गीरगोसावी, रमेश इनामदार,कुमुदिनी घोडके,विजया जिवतोडे, शैलजा कुलकर्णी, पुणे महापालिकेचे शेटे साहेब, विविध खात्यातील सेवानिवृत्त संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या दिवशी पेन्शनचे खाजगीकरण , प्राथमिक विभागातील मुख्याध्यापकांचे अर्ज तर रजा रोखीकरण, निवडश्रेणी ,३०जून रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना १ जूलैची वेतनवाढ , जेष्ठतेनुसार १० % पेन्शनवाढ , केंद्रीय कर्मचारी व सेवानिवृत्त यांचे मध्ये पेन्शन नियम ८ मध्ये झालेला बदल , २३ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय , जेष्ठ सेवानिवृत कर्मचारी व जेष्ठ नागरिकांना कार्यालयात मिळणारे सहकार्याचे शासन निर्णय याबाबत विविध प्रतिनिधींनी आपापली मते मांडली.
विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी सेवानिवृत्तांच्या अनुभवाचा उपयोग सर्वांनी समाजहितासाठी करून घ्यावा असे सांगून महानगरपालिकेच्या वतीने सर्वांना सेवानिवृत सेवक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. परिषदेचे अध्यक्ष दिपक रांगणेकर यांनी प्रस्तावना केली कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार राजेंद्र पाटील यांनी मानले.
















