न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२२) :- ऐन हिवाळ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात अवकाळी पावसाने शनिवारी सायंकाळी चिंचवडला चांगलेच झोडपून काढले. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
शनिवारी (दि. १७) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाचे टपोरे थेंब बरसण्यास सुरुवात झाली. पावसाचा जोर अधिकच होता. मुख्य चौकातील पाण्याच्या तळ्यातून नागरिकांसह वाहनचालकांना वाट काढावी लागली. बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. पावसामुळे काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.
















