- चिखलीतील पाटीलनगरमधील घटना; तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०२२) :- भावास मारहाण केली, त्याबाबत फिर्यादी या आरोपी यांना विचारणा करण्यासाठी गेल्या होत्या. फिर्यादीच्या राहत्या घरासमोर आरोपींनी त्यांच्या डोक्यात रॉडने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांची आई यांना घराबाहेर बोलणे करण्यासाठी बोलावुन घेत त्यांना शिवीगाळी करीत हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा फिर्यादी यांची लहाण बहीण मध्ये आली. तिलादेखील हाताने मारहाण करुन आरोपींनी शिवीगाळी केली. त्यावेळी सह आरोपी यांनी चाकुने पाठीत वार करुन गंभीर दुखापत केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी ६.०० वा. ते (दि. १७) रोजी सायं ६.०० वा. सुमारास चिखलीतील पाटीलनगर येथील इंदीरानगर गार्डन शेजारील सार्वजनिक रस्त्यावर घडली.
२३ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी महीला आरोपी, विलास शिंदे, योगेश देवकुळे (रा. रामदासनगर, चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
















