न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२२) :- आईला आणण्यासाठी हुंदाई कंपनीची आय १० कार (एम.एच.१४.एचडी.३६२१) यामधुन प्रवास करीत असताना समोरुन येणाऱ्या ट्रॅक्टरचा (एम. एच. १४. जेएम. ०९७६) व फिर्यादीच्या कारचा अपघात झाला. त्याचा राग मनात धरुन ट्रॅक्टरवरील चालक आरोपी तसेच ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या दोन साथीदारांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सह आरोपी २ याने त्याच्या पॅन्टच्या कंबरेच्या पट्टयाने फिर्यादीच्या डाव्या डोळयावर व छातीवर मारहाण करुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. ७) रोजी रात्री ८.०० वाजता चिखलीगाव ते जोतीबानगर, तळवडे रोडवर आय.बी.एम. कॉलेजसमोरील चौकात सोनावणे वस्ती, चिखली येथे घडली.
फिर्यादी सईद अन्वर अब्दुल शेख (वय २७ वर्षे, धंदा नोकरी, रा. देवराई हौसिंग सोसायटी, बी विंग, फ्लॅट नंबर ७०५, जाधववाडी, वडाचामळा, चिखली) यांनी आरोपी रोहित भानुदास यादव, भानुदास यादव (रा. रामदासनगर, चिखली) त्यांचे दोन साथीदार (नाव व पत्ता माहीती नाही) यांच्या विरोधात चिखली पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
















