कष्टकरी महिलांच्या वतीने महापौर झाल्याबद्दल राहुल जाधव यांचा सत्कार !
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : कष्टकरी कामगार पंचायत व महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्यावतीने गुरुवार दि. ६ सप्टें. रोजी पिंपरी येथे नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कष्टकरी महिलांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
सत्कार स्वीकारताना राहुल जाधव यांनी रिक्षा चालक, घरकुल धारक, साफसफाई कामगार महिला अशा गोरगरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले.
यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, सचिव धर्मराज जगताप, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, शोभा शिंदे, रवी शेलार, राम पल्हारे, प्रवीण निकम, रतन गायकवाड आदी उपस्थित होते.
राहुल जाधव म्हणाले पिंपरी चिंचवड शहर हे कामगार कष्टकऱ्यांचीनगरी आहे. या शहरात गोरगरीब कष्टकरी जनतेला सन्मानाने जगाता आले पाहिजे, त्यांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न करू.
कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि, एक सर्वसामान्य रिक्षा चालक ते महापौर असा प्रवास करणारे राहुल जाधव हे महापौर झाले असून त्यांच्या कारकिर्दीत कष्टकरी जनतेचे प्रलंबित प्रश्न सुटणार असून कष्टकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत.










