न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड : गणेशोत्सवात कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये याकरीता प्रभाग क्रमांक १८ मधील कार्यक्षम नगरसेवक सुरेश भोईर यांनी महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांबरोबर गणेश विसर्जन घाटाची पाहणी केली.
गणेश विसर्जन घाट व आसपासच्या परिसरात स्वछता अभियान राबविणे व डागडुजीसह किरकोळ दुरुस्ती करण्याच्या सूचना नगरसेवक सुरेश भोईर यांनी या अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी ब’ प्रभाग स्थापत्य अधिकारी घारे, धानोरकर, आरोग्य अधिकारी पारवाल, इंदलकर, महावितरण सदस्य मधुकर बच्चे, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गुरव, बाळकृष्ण नाईक, आदी उपस्थित होते.










