न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी :- येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचलीत न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी सरस्वती पूजन करून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते भगवान गोडांबे, मंजुळा मुदलीयार, मुख्याध्यापिका श्राबनी पत्रानाबिश व शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्त शाळेतील शिक्षिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.
जिल्हा क्रीडा परिषद व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत यश मिळवलेल्या मनश्री निकाळजे या आठवीतील विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.
भगवान गोडांबे यांनी विद्यार्थांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णण यांच्या कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीतील विद्यार्थी विनायक काटे याने केले तर आभार प्रदर्शन आठवीमधील विद्यार्थिनी पूजा चौधरी हिने केले.