न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२३) :- पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी येथील हॅरिस पुलाखाली मुळा नदीत ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला आहे. आज मंगळवारी (दि. १७) रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. औंध अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह बाहेर काढला. मयत तरुण हा बोपोडीतील रहिवाशी आहे. मृतदेह ससून रूग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची ओळख पटली असून मृताचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले आहेत, अशी माहिती खडकी पोलिसांनी दिली आहे.