- आ. जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२२) :- चिंचवड आणि पुण्यातील कसबा विधानसभेच्या रिक्त जागांवरील पोट निवडणूक जाहीर झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणुका जाहीर केल्या आहेत. २७ फेब्रुवारीला मतदान होणार असून २ मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
चिंचवड विधानसभेचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले. तसेच कसबापेठ मतदारसंघातील मुक्ता टिळक यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे दोन्ही जागांवर पोटनिवडणुका होणार आहे.
निवडणूकीसची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी आहे. ७ फेब्रुवारीला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारीला अर्जांची छाननी तर १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. मतदान २७ फेब्रुवारीला होणार असून निवडणूकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.