न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा आणि कोयता जवळ बाळगणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. वाकड आणि निगडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत काळेवाडीतील विजयनगर परिसरातील स्मुर्ती संकुल बिल्डींग समोर, साई एमरॉल्ड सोसायटी परिसरात (दि. २१) रोजी सकाळी १०.०० वाजेच्या सुमारास आरोपीने ८ किलो ७२८ ग्रॅम वजनाचा २,२०,३४० रुपये किंमतीचा गांजा जवळ बाळगला आहे, अशी माहिती वाकड पोलिसांना मिळाली.
त्यांनी कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. त्याने हा गांजा सह आरोपी २ याच्याकडुन कामरकुडा, जि. भोस, ओडीसा येथून आणला होता. जवाहार अर्जुनदास रामनानी (वय ६६ वर्षे, रा. फ्लॅट नं. ३०१, ए विंग, साई एमरॉल्ड सोसायटी, विजयनगर काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. भैरन बिनदाडी (रा. कंटरइंगीया, जिल्हा कंदमाल संबलपुर, ओडीसा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत आकुर्डीतील पाटील दवाखान्याजवळ (दि. २१) रोजी दुपारी २.३० वा. सुमारास आरोपीने लोखंडी कोयता सोबत बाळगला असल्याची माहिती पोलिसांनी समजली.
निगडी पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. शिवम सुनील दुबे (वय २० वर्षे, रा. रुम नं ३, नारायण पांढरकर चाळ, पाटील दवाखान्याजवळ, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.