न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- चिंचवड स्टेशन येथील डी मार्ट समोरील ग्रेडसेप्रेटरमध्ये एका वाहनातून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाल्याने त्यावरून वाहने घसरून चालक जखमी झाले. तसेच वाहतूक कोंडीही झाली होती.
ग्रेडसेप्रेटरमध्ये आत येण्यासाठी मर्ज इन असताना सोमवारी (दि. २३) दुपारी अडीचच्या सुमारास एक वाहन ग्रेडसेपरेटरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे ग्रेडसेपरेटरमधून निगडीकडून पुण्याकडे जाणारी भरधाव वाहने एकमेकांवर आदळली. एका वाहनातून मोठ्या प्रमाणात ऑईल गळती सुरु झाली.
काही वेळातच रस्त्यावर सर्वत्र ऑइल पसरले. ऑईलचा अंदाज येत नसल्याने त्यावरून दुचाकीचालक घसरले. काही जणांना दुखापतही झाली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच जवानांनी ऑइलवर माती टाकून रस्ता स्वच्छ केला.