- ७० तोळे सोन्याचे दागीने व ८ लाखांची रोकड हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जानेवारी २०२३) :- हिंजवडी पोलीस गुन्हे शोध पथकाने घरफोडी, चोऱ्या करणारी टोळी जेरबंद केली असून गुजरात येथे विक्री केलेले गुन्ह्यातील ७० तोळे सोन्याचे दागीने व ८ लाखांची रोकड हस्तगत केली आहे.
फिर्यादी पोपट श्रीहरी चांदेरे (वय ४४, रा. दत्त मंदिराशेजारी, सुसगाव) हे कुटुंबासह बाहेर गावी गेले होते. (दि. २३/१२/२०२२) रोजी सकाळी ७.३० वा ते (दि. २४/१२/२०२२) रोजी सकाळी ११.०० वा चे दरम्यान अज्ञात चोरटयाने सुसगाव ता. मुळशी येथील त्यांच्या रहात्या घराचा मुख्य दरवाज्याचा कडी कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहयाने तोडुन घरात प्रवेश केला. बेडरुमधील कपाटातील ११२ तोळे सोन्याचे दागीने व रोख रक्कम चोरून नेली. हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं १२४७ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्ह्याच्या तपासादरम्यान ५७ पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे तांत्रीक विश्लेषण व गोपनीय बातमीदारामार्फत संशयीत इसम व केटीएम मोटारसायकलची माहीती घेत असताना सपोनि सागर काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली. सुस येथील घरफोडीतील संशयीत इसम हे स्प्लेडर के एम. एच. १२ / जेव्ही ८८०७ वरून बापूजी बुवा मंदीर फेज ३. येथे येणार आहेत. अशी बातमी मिळाल्याने सपोनि सागर काटे व पोलीस पथक यांनी ट्रॅप लाऊन संशयीत इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.
अजय सर्जा नानावत (वय २७ वर्ष, रा. करमोळी पुलाजवळ ता. मुळशी), कन्हैया विजय राठोड (वय १९ वर्ष, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास करता, अजय सर्जा नानावत याने मी दिवसा घराची रेकी करून रात्री माझे इतर साथीदार कन्हैय्या राठोड, मोहन, अनिरूध्द योगेश राठोड ऊर्फ नानावत व त्याचे दोन मित्र यांच्यासह येऊन घरफोडी केली. त्यातील मुद्देमाल आशा ठक्कर (रा. अहमदाबाद, गुजरात) व अरमान नानावत (रा. वाघोली, पुणे) यांना विकला असल्याचे सांगीतले व विकुन आलेली रक्कम रूपये ८,००,००० रू. बँक अकाऊंटवर जमा केल्याचे त्याने सांगीतले. त्या दोघांना अटक केली. पुढील तपासात हिंजवडी पोलीस ठाणे गुरनं ५९१ / २०२२ भादवि कलम ४५४, ४५७,३८० २) १०९२/२०२२. भादवि कलम ४५४,४५७.३८० हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.
अजय सर्जा नानावत याने सागीतलेल्या आशा ठक्कर, रा. अहमदाबाद गुजरात यांच्या तपासकामी सपोनि सागर काटे, पो. हवा. ३९४ घुमाळ, पो ना. १५७६ नरळे, पोशि २२८४ पालवे, मपोशि सोनाली ढोणे यांचे तपास पथक गुजरात येथे गेले. सलग १५ दिवस गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे शोध घेतला असता अहमदाबाद येथील पथकास ती पुण्यात येणार असल्याची माहीती मिळाल्याने तपास पथकाचे सपोनि राम गोमारे यांना त्याची माहीती देऊन आशा ठक्कर हिस पुण्यामध्ये ताब्यात घेतले. तीच्या निशानदेही प्रमाणे अहमदाबाद येथे गेलेल्या तपास पथकाने ६६ तोळे सोन्याचे दागीने जप्त केले. अशा प्रकारे अजय सर्जा नानावत याचेकडून गुन्ह्याच्या तपासात ४ तोळे सोने व ८,००,००० रू रोख रक्कम व महीला आरोपी आशा राजूभाई ठक्कर हिचेकडून ६६ तोळे दागीने असे एकुण ७१ तोळे सोन्याचे दागीने व ८,००,००० रोख रक्कम जप्त केली. तसेच ३ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गुन्ह्यातील पाहीजे आरोपी व उर्वरीत मुद्देमाल याचा पोलीस शोध घेत आहोत.आरोपी अजय सर्जा नानावत याने एकंदरीत ४८ गुन्हे केल्याचे यापुर्वी निष्पन्न झालेले असून त्यातील हिंजवडी पोलीस ठाण्यास गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोज लोहीया, पोलीस सह आयुक्त, डॉ. संजय शिंदे सो, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. श्री. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परि. २, पिंपरी चिंचवड श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग पिं चिं यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उप निरीक्षक अजीत काकडे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, सुभाष गुरव, सोनाली ढोणे, श्रुती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली आहे..