न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशन व विधिसेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी न्यायालय व आकुर्डी येथील मनपा. न्यायालयामध्ये महालोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे. के. एम. पिंगळे व इतर न्यायाधीश यावेळी उपस्थित होते. यावेळी आकुर्डी येथील न्यायालयामध्ये मे. माधुरी खनवे, कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अतिश लांडगे, प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अॅड. सुनील कड, पिंपरी- चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. अतिश लांडगे म्हणाले कि, लोकन्यायालयामुळे पक्षकारांचा व न्यायालयाचा वेळ वाचतो, महत्वाचे म्हणजे खर्चही वाचतो त्यामुळे पक्षकारांनी आपले खटले लोकन्यायालयाच्या माध्यमातून सोडवणे गरजेचे आहे.
मा. न्यायाधीश ए. यु. सुपेकर यांनी लोकन्यायालयामार्फत खटले निकाली निघाल्यामुळे न्यायालयावरील भार कमी होईल व पक्षकारातील वितुष्ठ कमी होऊन सर्वांचा वेळीही वाचेल असे सांगितले, तर अॅड. सुनील कड यांनी सर्वांना सामपोचाराने व जास्तीत जास्त खटले निकाली काढण्यासाठी विधिसेवेमार्फत राबवल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्ष पुणेकर यांनी लोकन्यायालयाचे उद्दिष्ट, त्याचे फायदे पक्षकारांना समजावून सांगितले. देशातील न्यायालयीन स्वरूप पाहता न्यायालयीन निकालास लागणारा वेळ व त्यामुळे प्रलंबित खटले या सारासार गोष्टींचा विचार करून पक्षकारांनी सामंजस्याने आपले खटले या लोकन्यायालयाच्या माध्यमातून सोडवावेत. जेणेकरून आपला वेळ, खर्च, होणारा मानसिक त्रास या गोष्टीतून स्वतःची सुटका होईल. लोकन्यायालय एक प्रभावी माध्यम असून त्याचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन एकमेकांमध्ये एकोपा राखावयास हवा असे त्यांनी नमूद केले.
या लोकन्यायालयामध्ये पिंपरी न्यायालयाचे 104 दाखल खटले निकाली लागले तर 33 प्रिलीटिगेशन म्हणजेच दाखलपूर्व खटले निकाली निघाले. हे खटले एकूण 8, 01, 00,106/- एवढ्या रकमेचे होते. तर दाखलपूर्व ३३ खटले निकाली निघाले. त्याची एकूण रक्कम 4,63,269/- होती.
लोकन्यायालयामध्ये पॅनल परिक्षक म्हणून अॅड. मोनिका गाढवे, अॅड. सुषमा वासने, अॅड. अंकुश गोयल, अॅड. अंतरा देशपांडे, अॅड. शिवाजी महानवर, अॅड. कुसुम पुलसे, अॅड. संगीता कुशालकर, अॅड. केशव घोगरे यांनी काम पाहिले.
यावेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे, अॅड. प्रदीप ढोले, अॅड. अतुल अडसरे, अॅड. गणेश शिंदे, अॅड. सुदाम साने, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. संभाजी वाघमारे, अॅड. जॉर्ज डिसुजा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. योगेश थंबा यांनी केले. तर आभार प्रदर्शन सचिव अॅड. तुकाराम पडवळे यांनी मानले.










