न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२३) :- मारुंजीत २ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा विक्रीसाठी जवळ बाळगणारा व पिस्टल हत्यार जवळ बाळगणा-या दोन आरोपींच्या हिंजवडी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
पहिल्या कारवाईत हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सरकार चौक, मारुंजी येथे एकजण रहात्या घरात अमली पदार्थ गांजा जवळ बाळगुन विक्री करीत असल्याची माहिती (दि. २९) रोजी पोलिसांना मिळाली. वरिष्ठांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. पथक कारवाई करण्यासाठी गेले. पोलीसांची चाहुल लागताच गांजाच्या पिशवीसह आरोपीने तिथून पळुन काढला. पोलीसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडील कापडी पिशवीत ६५,७७५ रुपयांचा २ किलो ६३१ ग्रॅम अमली पदार्थ गांजा जप्त मिळून आला. मंगेश सहदेव गायकी (रा. नवनाथ जगताप यांची चाळ, रुम नंबर ३, सरकार चौक, मारुंजी) असे अटक कलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुध्द एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत बेकायदेशिरपणे आरोपीने पिस्टल हत्यार व एक काडतुस जवळ बाळगल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अनंतानगर, लक्ष्मी चौक, मारुंजी येथुन आरोपीला (दि. २८) रोजी ताब्यात घेतले. गणेश पंढरी कांबळे (वय. २३ रा. आनंतानगर, लक्ष्मी चौक, मारुंजी, मुळगाव रा. मुळज ता. उमरगा जिल्हा उस्माना बाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महा. पो. अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही कारवाया विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मनोजकुमार लोहीया सहपोलीस आयुक्त, डॉ संजय शिंदे अप्पर पोलीस आयुक्त, काकासाहेब डोळे पोलीस उप आयुक्त परि.२, श्रीकांत डिसले सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डॉ. विवेक मुगळीकर, सुनिल दहिफळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सोन्याबापू देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे), अवैध धंदे विरोधी पथकाचे प्रमुख सपोनि अजितकुमार खटाळ, सपोनी संदिप देशमुख, सहा. पो. फौजदार महेश वायबसे, पोहेकॉ / १०४१ संतोष डामसे, पोहवा / ७८४ महेश शिंदे, अमंलदार / २६५९ रवी पवार, पोअमंलदार / २६९४ गाडे यांनी केली आहे.