न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आज संपूर्ण देशात भारत बंदचे आवाहन करून देशातील तमाम विरोधी पक्षांच्या सहकार्याने काँग्रेसने पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला.
विरोधी पक्षांच्या या भारत बंद मोहिमेला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला. पिंपरी-चिंचवड शहरात भारत बंदच्या हाकेला मनसेने साथ देऊन बंद यशस्वी केला. या बंदच्या माध्यमातून शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी नवी उभारी घेऊन कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी जागृत करण्याचे काम केले असल्याचे पाहावयास मिळाले.
पिंपरी येथे वाढत्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली दापोडी ते निगडी दरम्यान असलेल्या ग्रेड सेपरेटर मध्ये रस्ता रोको करून आंदोलन करण्यात आले.
मनसैनिकानीं रस्त्याच्या दुतर्फा चक्काजाम करून वाहतूक अडवली व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरीही मनसैनिकांनी गोंधळून न जाता सरकारविराधी घोषणा दिल्या. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी मनसैनिकांना अटक करून ताब्यात घेतले आहे.
यात शहराध्यक्ष सचिन चिखलेे, अश्विनी बांगर, सिमा बेलापुरकर, अदिती चावरीया, सेन्हल बांगर, रुपालीताई गिलबिले, अनिता पांचाळ, शोभा चावरीया, मयुर चिंचवडे, अक्षय नाळे, दत्ता देवतरासे, विशाल मानकरी, नितीन चौव्हान आदींचा समावेश आहे.