न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२३) :- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्वतः मंजुरी दिल्याबद्दल मी केंद्रीय मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी यांचा अतिशय आभारी आहे. या प्रकल्पामुळे या दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल’. त्याचबरोबर ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी १३,५३९ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आभार व्यक्त करतो’.












