न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १२ मार्च) :- भोसरी येथील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी तडकाफडकी अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. मात्र, आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे लांडे यांनी राजीनामा अर्जात म्हटले आहे.
लांडे यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजीच सहकार आयुक्त व निबंधक यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात वैयक्तिक कारणामुळे अध्यक्ष व संचालकपदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.