न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : भाजप सरकार हे ‘पारदर्शक’ कारभाराचा उत्तम नमुना असून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे या सरकारचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. दिनेश यादव हे प्रभागाकरिता समाजपयोगी कामे करत असून पक्षाला अशा शिलेदाराची गरज आहे.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड ‘फ’ विभागाचे स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव व शहीद शंकर गॅस एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू महिलांकरीता मोफत गॅस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांच्या वतीने त्यांच्या पत्नी मंगलताई जाधव यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत गोरगरीब व गरजू १०० महिलांना मोफत गॅसचे वितरण करण्यात आले.
प्रा. प्रदिप कदम सर यांनी उपस्थित नागरिकांना जिवन जगण्याचा मूलमंत्र सांगितला व सामाजिक एकोपा राखण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे नमूद केले.
याप्रसंगी अभिनेत्री प्राची पालवे, सुरेश डोळस, प्रशांत रोकडे, मंगल जाधव, नगरसेविका करूणा चिचंवडे, साधना मळेकर, नगरसेवक सुरेश म्हेत्रे, कुदंन गायकवाड, संतोष मोरे, सांगर हिगंणे, पांडुरंग भालेकर, गोपीकुष्ण धावडे, संतोष जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ कोहीनकर, संरपच काळुराम यादव, चेअरमन दत्तात्रय मोरे, गुलाब बालघरे, ज्ञानेश्वर मोरे, किसन बालघरे, आंनदा यादव, पांडुरंग बालघरे, उत्तम यादव, किसन हरगुडे, मुरलीधर ठाकुर,युवराज पवार,किसन यादव, विजयराज यादव,सोपान ढमाले, उत्तम बालघरे, पप्पू लांडगे, गणेश यादव ,नवनाथ मुह्रे,किसन बावकर,कोंडीबा यादव, दत्तात्रय बालघरे, अशोक यादव, बाळासाहेब पवार, रामकृष्ण लांडगे, फिरोज शेख, चांगदेव बालघरे, अर्जुन लांडगे, केरूभाऊ बालघरे, शैलेश मोरे, लालचंद यादव व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी शहीद शंकर गॅस एजन्सीचे दीपक डोके व त्यांच्या संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय तरटे यांनी केले. तर आभार काका शेळके यांनी मानले.