न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी अखेर भाजपमधील अंतर्गत कलहाला वाचा फोडली आहे.
कामठे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत थेट पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने या पक्षाचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. याआधीही कामठे यांनी कार्यकाल संपण्याआधीच नगरसेवक पदाचा राजीनामा दिला होता.
पक्षाचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्याकडे पाठविला आहे. ऐन पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी दिलेला राजीनामा हा भाजपचे पाय आणखी खोलात ढकलणारा ठरला आहे.


















