- छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या व्यापक विचारांची जोपासना सर्वानी करावी असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२३ चे आयोजन भक्ती-शक्ती चौक निगडी, संभाजीनगर चिंचवड, डांगे चौक थेरगाव आणि एच.ए. कॉलनी, पिंपरी या चार ठिकाणी करण्यात आले आहे. या पर्वाचे उदघाटन काल भक्ती-शक्ती चौक, निगडी येथे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे हस्ते झाले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना शेखर सिंह बोलत होते.
आयुक्त सिंह म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष ऑफलाईन कार्यक्रम करता आले नाहीत.शिवाजी महाराजांच्या विचाराची जोपासना व्हावी तसेच त्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत याकरीता महानाट्यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश यावर्षी केला आहे.महापालिकेचे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आणि विनामूल्य असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असेही आवाहन यावेळी आयुक्त सिंह यांनी सर्व नागरिकांना केले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, कार्यकारी अभियंता संजय थोरात, नितीन देशमुख, माजी नगरसदस्य मारुती भापकर, सचिन चिखले,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,जनसंपर्क विभागाचे प्रमुख प्रफुल्ल पुराणिक,प्रकाश जाधव,सतीश काळे, धनाजी येळकर पाटील,जीवन बोराडे,सागर तापकीर, नकुल भोईर,राणेश दाहिभाते, ज्ञानदेव लोभे,राजेंद्र देवकर,गणेश सरकटे,गणेश भांडवलकर,सचिन आल्हाट,राजू पवार,सुरज ठाकर, संतोष वाघ,अभिषेक म्हसे,निलेश शिंदे, जालींदर खतकर,कल्पना गिड्डे,दादासाहेब पाटील,कुणाल कांबळे,स्वप्नील शिंदे,दत्तात्रय शिंदे,विनायक जगताप,वैभव फाळके,शहश कानेकर,श्रेयश कानेकर,अनिकेत रसाळ,भावेश काचा,नकूल भोईर,शिवजयंती भक्ती-शक्ती समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहीर देवानंद माळी यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्यानंतर महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते डॉ.शिवरत्न शेट्ये यांचे असे होते छत्रपती शिवाजी महाराज या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यानातून महाराजांचा इतिहास सर्वाना सांगितला. शिवाजी राजे युद्धकला,राजनीती,प्रखर देशभक्ती आणि निपुण तर होतेच याशिवाय ते कुशल प्रशासक,उत्तम संघटन कौशल्य असलेले आदर्श राजे होते असेही डॉ.शिवरत्न शेट्ये यांनी त्यांच्या व्याख्यानातून सांगितले. शिवजयंती भक्ती-शक्ती समितीच्या सदस्यांनी आयुक्त सिंह यांचा सत्कार केला.तसेच ख्यातनाम शाहीर देवानंद माळी,सनई वादक रमेश पाचंगे यांचा सत्कार आयुक्त सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी आणि
सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार शिवजयंती भक्ती-शक्ती समितीचे जीवन बोराडे यांनी मानले.


















