न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक लहूजी वस्ताद साळवे आणि वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक तसेच माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, कमल घोलप, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समितीचे अध्यक्ष संजय ससाणे, संदिपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, मयूर जाधव, संदिप जाधव, विशाल कसबे, दत्तू चव्हाण, शिवाजी साळवे, डी. पी. खंडाळे, अण्णा कसबे, मिना कांबळे, स्वप्निल जाधव, विनोद कांबळे, विकी लोखंडे, शिवशंकर उबाळे, सचिन सकाटे, सतीश भवाळ, ज्योती वैरागर, अभिजीत भालेराव, संदीप जावळे, उद्धव म्हस्के, नारायण गायकवाड, बाजीराव मोरे, प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते.
















