- पिंपळे गुरवमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या पदयात्रेला मतदारांचा प्रतिसाद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- जनतेने कायमच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना मताधिक्य दिले आहे. दुःखाच्या वेळीही पिंपळे गुरवकर दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना लाखाच्या मताधिक्याने निवडून आणतील, असा विश्वास भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी आज गुरूवारी (दि. २३) रोजी पिंपळे गुरव परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. त्यांच्या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेचे नागरिकांकडून जोरदार स्वागत झाले.
प्रचार संपण्यास अवघा एक दिवस शिल्लक असल्यामुळे या पदयात्रेत शंकर जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाजपला मोठ्या मतांच्या फरकाने निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले. पिंपळे गुरवकरांनी “ओन्ली कमळ” चा ध्यास घेतला आहे. घोषणाबाजीमुळे परिसर अवघा भाजपमय झाला होता. यावेळी माजी नगरसेवक सागर आंगोळकर, माजी प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप यांच्यासह भाजप-शिवसेना महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
















