न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी : रहाटणी येथील रामनगर परिसरात गेली अनेक दिवसांपासून पाणीप्रश्न भेडसावत असल्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. हि बाब लक्षात घेऊन स्विकृत नगरसेवक संदिप नखातॆ यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सहकार्याने प्रशासनाकडे पाठपुरावा चालू केला.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेऊन प्रशासनाने रामनगरमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केले आहे.
यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे आदींनी मदत केली. रामनगर मधील पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार असल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे संदिप नखाते यांनी सांगितले.