न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : नेहरूनगर परिसरातील झिरो बॉईज चौक ते अजमेरा कॉलनीतील रस्त्यालगतचे फुटपाथ सहा महिन्यांपासुन उखडलेले आहेत. याबाबत गेली अनेक दिवसांपासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख गणेश जाधव यांच्या वतीने क प्रभाग अधिकारी यांना फुटपाथची समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरिता निवेदन देण्यात आले. पादचारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे विद्यासागर गायकवाड, गोरकनाथ कवडे, कैलास कुदळे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.