न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ फेब्रुवारी २०२३) :- मतदान प्रक्रिया सुरळात आणि शांततेत पार पडण्यासाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १२८ गुन्हेगारांना डिटेन्ड केले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, अशी नोटीस देऊन त्यांना सोड्रन देण्यात आले. तसेच मतदान केंद्र परिसरात गर्दी करणाऱ्या २५ जणांना देखील पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यांना समज देऊन सोडून दिले.
विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांकडून कोमि्बंग ऑपरेशन करण्यात आले. तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर देखील कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले. कारवाईचा धसका घेऊन निवडणूक काळात काही गुन्हेगार गायब देखील झाले. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी अशा गुन्हेगारांचा तसेच पाहिजे आरोपींचा शोध घेतला.
चिंचवड, सांगवी, हिंजवडी, वाकड, देहूरोड व रावेत या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत मतदान झाले. त्यामुळे या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगार, पाहिजे आरोपी, उपद्रव मूल्य असलेल्यांवर पोलिसांनी कारवाई केली. मतदानाच्या दिवशी उपद्रव करण्याची शक्यता असलेल्या एक हजार जणांपेक्षा जास्त जणांना नोटीस बजावली.
मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. त्यासाठी पोलिसांसह सर्वच घटक व यंत्रणांनी सहकार्य केले. काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.
– डॉ. काकासाहेब डोळे, पोलिस उपायुक्त…















