न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२३) :- राष्ट्रीय विज्ञान दिवस भारत सरकारच्या विज्ञान प्रोद्योगिकी विभागातर्फे संपूर्ण देशात भारताचे प्रथम भौतिक शास्रातील नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांनी लावलेल्या रमण परिणामाच्या स्मृती प्रित्यर्थ साजरा केला जातो. याच दिवशी संपूर्ण जगाला या शोधाची माहिती प्राप्त झाली.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क गेल्या दशकापासुन विविध वैज्ञानिक जागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून पुणे परिसरात कार्यरत आहे. पालिका निर्मित वैज्ञानिक संस्थेद्वारा दि. २३ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या दरम्यान विज्ञान जागृती मनोरंजन आणि संशोधनवृतीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये २३ ते २६ फेवारी २०२३ दरम्यान रचनात्मक कार्यशाळेमध्ये प्रथम एजुकेशच्या ७० विद्यार्थ्यांनी निवासी कार्यशाळेत भाग घेऊन विज्ञान अभ्यासक्रमातील प्रयोग केले.
प्राध्यापक दिनेश कलाल यांनी रसायनातील गमती जमतीवर आधारित प्रात्यक्षिक दाखविली. २५ फेब्रुवारी रोजी चित्रकला चर्चेमध्ये सुमारे विद्यार्थ्यानी १७० विद्यार्थ्यांनी ” पर्यावरण ” या विषयावर स्वतःच्या कल्पनेतील चित्रे काढली. ” बनवा व घेऊन जा ” या प्रात्यक्षिकामध्ये ६५ विद्यार्थी व पालकांनी स्वतः वैज्ञानिक साधनं बनविली, विज्ञान सप्ताह दि. २७ फेब्रुवारी रोजी इनोव्हेटीव्ह सायन्स प्रोजेक्ट मध्ये ६४ प्रकल्पांनी सहभाग नोंदविला.
दिनांक २८ फेब्रुवारी रोजी विविध विज्ञान कार्यक्रमांच्या रेलचेलीमध्ये सकाळी अगस्त्य फौडेशन पुणे, वनस्थळी पुणे व अंकनाद पुणे या संस्थांच्या वतीने विज्ञान प्रदर्शन व प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. दुपारी १ ते ३ च्या दरम्यान आखिल भारतीय जादुगार असोशियनचे धिमंत मश्राणी (बलसाड गुजरात) यांनी विज्ञान व त्यामधील जादुचे मनोरंजक प्रयोगांचा लाभ सुमारे १८० विद्यार्थ्यांनी घेतला. तसेच त्यानंतर देवानंद कांबळे यांचे गमतीशीर विज्ञानाचे प्रयोग सादर करण्यात आले. विज्ञान प्रश्नमंजुषा व सकार दरम्यान आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण पिं.चिं.सा.पार्क चे संस्थापक संचालक प्रविण तूपे व आधारकर संशोधन संस्थेचे डॉ. दत्तात्रय नाईक यांच्या शुभहस्ते झाले. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत आकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.