न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- यमुनानगर येथील दि हॅपी फीट प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानप्रबोधिनी येथील मनोहर वाढोकर सभागृहात पार पडले. छोट्या मुली, मुलांनी आपली कला साभिनय सादर केली. ४४ मुली, मुलांनी सहभाग घेतला.
मुलांच्या नृत्याचे संचलन विराट व अमृता वाईरकर यांनी केले. शाळेच्या संचालिका, मुख्याध्यापिका पूजा शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. शाळेच्या शिक्षिका आबा जोशी, दिपाली मोरे, रोहिणी भालेराव, श्रीदेवी व अश्विनी वांगणे यांचे विशेष कौतुक पालकांनी केले.
आलाप संगीत विद्यालय आणि कलांगण कथ्थक क्लासच्या अश्विनी तळेगावकर व प्रज्ञा शिंदे यांच्या विद्यार्थिनींनी आपली कला सादर केली. पालकांनी, आजी, आजोबांनी मुलांचे कौतुक करत सहभाग घेऊन मुलांचे मनोधैर्य वाढविले व कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन अंकिता वारियर यांनी केले.