न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २६ वे फुले, फळे, भाजीपाला, बागा, वृक्षारोपण स्पर्धा व भव्य प्रदर्शन “रानजाई” महोत्सव रंग, गंध, सृजनाचा १० ते १२ मार्च २०२३ या कालावधीत महापौर निवासस्थान, निगडी प्राधिकरण येथे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये संजय मेहता यांना आयुक्त चषक पारितोषिक, भारत दिलीप भुजबळ यांना महापौर चषक पारितोषिक, फुलांची राणी व फुलांचा राजाचे पारितोषिक जयवंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान सहकारनगर यांना मिळाले.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, सुभाष इंगळे, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी उपस्थित होते.
संजय मेहता, खडकी यांना ‘ आयुक्त चषक खाजगी बाग शौकीन’, भारत दिलीप भुजबळ, लक्ष्मी फ्लावर अँड डेकोरेशन लांडेवाडी, भोसरी यांना ‘ महापौर चषक कुलावट ‘, जयवंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान, सहकार नगर पुणे यांना फुलांची राणी संसारा चषक, जयवंतराव टिळक गुलाब पुष्प उद्यान सहकारनगर, फुलांचा राजा यांना अल्फा लावल चषक प्रदान करण्यात आला.















