- दलालांना जेरबंद करीत तब्बल ९ पिडीत महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी वेश्याव्यवसाय करवुन घेणाऱ्या दलालांवरती कारवाई करुन ९ पिडीत महिलांची सुटका केली आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभाग व युनिट २ यांनी वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि. १२) रोजी एकाच दिवशी ही कारवाई केली आहे.
पहिल्या कारवाईत मुलींकडुन कस्पटे वस्ती, मानकर चौक, संस्कृती आर्केट बिल्डींग, चौथा मजला, शॉप नं ४०३, येथिल Age Line Wellness Spa नावाचा चालक मालक स्पा सेंटरच्या नावाखाली पैशाचे अमिष दाखवुन वेश्या व्यवसाय करवुन घेत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध विभाग व युनिट २ मधील पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांनी छापा टाकुन महिला आरोपीला ताब्यात घेतले. ४ पिडित महाराष्ट्रीयन महिलांची वेश्या व्यवसायातुन सुटका केली आहे.
महिला आरोपीकडून ६,३०० रु. रोख रक्कम, १०० रुपये किंमतीचे इतर साहित्य, ८,००० चा एक मोबाईल फोन, २,२०० रुपयांचे एटीएम कार्ड स्वीप करण्याचे मशीन असा एकुण १६,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
स्पा मॅनेजर महिला आरोपीला अटक केली असून पाहिजे आरोपी, मंगेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे, रा. हिंजवडी), रविंद्र गायकवाड (पुर्ण नाव पत्ता माहित नाही), पाहिजे महिला आरोपी यांच्या विरुद्ध वाकड पोलीस स्टेशन येथे गुरन २४९/२०२३ भादवि कलम ३७० (३), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाकड पोलीस स्टेशन करीत आहे.
दुसरी कारवाई अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत स्पेनडेड सोसायटी, तळमजला संत तुकाराम कार्यालयासमोर, कस्तुरी, हिंजवडी येथील Jalsa Ayurveda नावाच्या स्पा सेंटरवर कारवाई केली. पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार व महिला पोलीस अंमलदार यांनी छापा टाकुन स्पाचे चालक मालक व मॅनेजर यांना ताब्यात घेवुन ५ पिडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. या पिडीत महिला १ कर्नाटक व ४ महाराष्ट्रीयन आहेत. आरोपींच्या ताब्यातुन ५५०० रुपये रोख रक्कम, ९० रुपये किंमतीचे इतर साहित्य, ८,००० चा एक मोबाईल फोन, असा एकुण १३,५९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी स्पा मॅनेजर सोमनाथ बाबुराव इरबतनवार (वय-३१ वर्षे, सध्या रा. जलसा स्पा, तळमजला, स्पॅनडेड सोसायटी, संत तुकाराम मंगल कार्यालया समोर, कस्तुरी चौक, हिंजवडी; मुळ रा. मु.पो. मांडणी, ता. अहमदपुर, जि.लातुर), सचिन रतन केदारी (वय २९ वर्षे, रा. शनिमंदिरा समोर, शंकर कलाटे नगर, वाकड), स्पा चालक मालक पाहिजे आरोपी रोहित मारुती दांडगडे (वय ४२ वर्षे, रा. सर्वे नं -७५ द्रोपदी लॉन्स समोर वाकड पुणे मुळ पत्ता लातुर) यांच्या विरुध्द हिजवडी पोलीस स्टेशन येथे गुंरन २३७/२०२३ भादवि कलम ३७० (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३.४.५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशन करीत आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये आजपर्यंत एमआयडीसी भोसरी, हिंजवडी, भोसरी, वाकड, दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील ४ स्पा (मसाज सेंटर) व १ लॉज असे एकुण ५ आस्थापना १ वर्षाकरीता सिलबंद करुन कारवाई केलेली आहे. तसेच इतर आस्थापना सिंलबदच्या कारवाई प्रस्तावित आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे). डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण (अ.मा.वा. प्र. कक्ष गुन्हे शाखा) पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम (युनिट-०२) पोलीस उपनिरीक्षक सिसोदे, पोलीस उपनिरीक्षक सोळके, पोलीस अंमलदार सुनिल शिरसाठ, सुधा टोके, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव दिलीप चौधरी, नामदेव कापसे, उषा दळे उध्दव खेडकर, शिवानंद स्वामी यांनी केली आहे.
–


















