न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२३) :- उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभागीय पुणे तथा अध्यक्ष, पदस्थ अधिकारी, जेष्ठ नागरीक निर्वाह न्यायधिकरण यांनी दिलेल्या आदेशप्रमाणे ठरवून दिलेला मासिक निर्वाह भत्ता फिर्यादी यांच्या आरोपी मोठ्या मुलाने त्यांना दिला नाही. फिर्यादीला शिवीगाळ करून राहत्या घरावर काळया रंगाने काहीही लिहून भिंतीचे नुकसान करीत विद्रुपीकरण केले. फिर्यादी व त्यांच्या पतीची मानसिक छळवणुक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार ऑक्टोबर २०२२ पासुन फेब्रुवारी २०२३ पर्यंत घडला. ६३ वर्षीय महिला फिर्यादी यांनी आरोपी मोठा मुलगा राजेश वसंत जामदार (वय ४२ वर्ष, सध्या रा. सिंहगड रोड, धायरी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १२९ / २०२३ जेष्ठ नागरिक आणि पालक यांचे पालन पोषण आणि कल्याण कायदा कलम २४ सह भा.दं.वि. कलम, ५०४, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत ४१ (१) नुसार नोटीस दिली आहे.