न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मार्च २०२३) :- पाच किलोमीटर मॅरेथॉन ३४ मिनिटात पूर्ण. स्पोर्ट्स फोर ऑल २०२२ या अंडर आठ वर्षे वयोगटात ५० मीटर रनिंग मध्ये तीसरा नंबर पटकावून ब्रांच मेडल आणि आता सातव्या वाढदिवशी ५१ किलो मीटर सायकलवर सी.एम.ई, खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी, असे पुणे दर्शन करणाऱ्या रिआन चव्हाणने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद करीत विक्रम केला आहे.
तो केंद्रीय विद्यालय, देहूरोड नंबर एक या शाळेत दुसरीत शिकत आहे. रिआनचे वडील देवेंद्र चव्हाण पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पोलीस निरीक्षक पदावर तर आई डॉ. अपर्णा या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहेत.
अवघ्या तीन वर्षांचा असताना त्याने सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले व नेहमीच मनात येईल तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी ट्रेक करत असतो.