- दापोडी मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- दापोडीत २० दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र आहे. या ठिकाणी सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी थेट नदिपात्रात सोडण्यात आले. मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगार मैला कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय उचलण्याचे काम करत होते. कामगारांच्या पायात बूट नव्हते, हंडग्लोज नव्हते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष सबंधित ठेकेदाराच्या उपस्थितीत हा प्रकार घडला आहे.
मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडण्यात आले. सुपरवाईजरकडे याबाबत विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळटाळ केली. मैलाशुद्धीकरण केंद्रात सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी नदिपात्रात वारंवार सोडण्यात येत आहे, असे निदर्शनास आले आहे. यामुळे नदिपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.
संबंधित ठेकेदारामुळे नदीपात्रातील प्रदूषण वाढत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी. संबधीत प्रकारची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी आणि आम आदमी पार्टीचे रविराज काळे, ऋषिकेश कानवटे, निरज सुतार यांनी केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास मनपासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


















