- नागरीवस्तीत पाळीव कबुतरांना खाद्य पुरवणाऱ्यास आर्थिक दंड करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना ५०० रूपये दंड लावा व कबुतर पाळण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य, सचिव (सार्वजनिक आरोग्य विभाग), आयुक्त पिंपरी चिंचवड महापालिका तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील काही महानगरपालिकांनी कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांना रूपये पाचशे दंड आकरण्यास सुरुवात केली आहे. कबुतरांच्या विष्ठा विविध श्वसनाच्या आजारांचे कारण ठरत आहे. अतिसंवेदनशील न्यूमोनिया आणि फुफ्फुसाच्या आजाराची प्रकरणे राज्यात सातत्याने वाढत आहेत. याला कबुतर खूप जबाबदार आहे, असं मानले जात आहेत. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे हे आजार पसरत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही याबाबत जनजागृती करत कारवाई करावी.
कबुतरांच्या विष्ठेमध्ये आढळणारे बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे फुफ्फुसात सूज येऊ शकते. अनेक नागरिक, तरुण मुले कबुतर पाळत असतात. परंतु त्यांची विष्ठा अतिशय घाण निर्माण करते. रोगराई निर्माण होण्यासाठी मदत करत आहे. त्यामुळे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने व पिंपरी चिंचवड महापालिकेनेही तातडीने याबाबत कारवाई सुरु करावी, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.