न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी प्रतिनिधी :- दोन अल्पवयीन मुलींवर साखर कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांनी बलात्कार केल्याची घटना रविवार दिनांक १६ रोजी हिंजवडी परिसरात घडली. या दोन्ही मुली शेतमजुरांच्या असून अल्पवयीन होत्या. यापैकी बलात्कार पीडित एका मुलीचा बुधवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरीची अवस्था चिंताजनक आहे.
पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन आरोपी गणेश निकम याला अटक केली असून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे घराजवळील मंदिर परिसरात त्या दोघी खेळत होत्या.
शेजारील साखर कारखान्यातील मजुरांच्या दोन मुलांनी या दोघींना एकटे पाहून चॉकलेटचे आमिष दाखवले व मंदिरामागे नेले. त्याठिकाणी घनदाट झाडी असल्यामुळे भयाण शांतता होती. आरोपींनी या दोघींना झुडपाआड नेऊन त्यांच्यावर आळीपाळीने पाशवी बलात्कार केला असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.
या दोन्ही बलात्कारपीडित अल्पवयीन मुलींच्या मनावर शारीरिक व मानसिक आघात झाल्यामुळे दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील एका मुलीचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मुलींच्या पालकांना सदर घटना समजली तेव्हा त्यांना काय करावे हे सुचत नव्हते. लोकलज्जा व मुलींचा भविष्याचा विचार करून त्यांनी गप्प राहणे पसंद केले व पोलिसात एफआयआर नोंदविण्यास नकार दिला, परंतु पोलिसांनी पालकांच्या मनातील भीती दूर करून फिर्याद दाखल करण्यास सांगितले तेव्हा मुलीच्या आईने फिर्याद दाखल केली.
दोन्ही बलात्कारपीडित अल्पवयीन मुलींपैकी एक मुलगी शुद्धीवर असल्यामुळे सदर घटनेचा जबाब घेऊन पोलिसांनी आरोपीना तात्काळ शोधून काढले. दोन्ही आरोपींपैकी एक मुलगा अल्पवयीन असून एक प्रौढ आहे. दोन्ही आरोपी अटकेत असून हिंजवडी पोलीसपथक पुढील तपास करत आहे.