- अनधिकृत नळ कनेक्शनवर कारवाईला प्रारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या क क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नेहरूनगर येथे तीन व भोसरीतील चक्रपाणी क्षेत्रातील पुणे नाशिक हायवे लगतच्या सहा अशा नऊ वॉशिंग सेंटरसाठी घेतलेले अनधिकृत नळ कनेक्शन पाणीपुरवठा विभागाने बंद केले आहेत.
यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क प्रभाग पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता, चार कनिष्ठ अभियंता, चार प्लंबर, दोन मीटर निरीक्षक व एम एस एफ चे एकूण १५ जवान यासह सदरची कारवाई करण्यात आलेली आहे.


















