न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच बर्ड व्हॅली येथील पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे उप आयुक्त रविकिरण घोडके,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आजच्या जयंती कार्यक्रमास माजी उपमहापौर तुषार हिंगे, निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, उद्योजक संजय ढेंबरे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे, सामाजिक कार्यकर्ते संदीप थोरात,योगेश बाबर,कुशाग्र कदम, धनाजी येळकर पाटील,संजय जाधव, प्रविण कदम,संतोष वाघे, सागर तापकीर, दादा शिरोळे,समीर जावळकर,लक्ष्मण रानवडे, लक्ष्मण रानवडे,दत्तात्रय देवतरासे, विशाल जाधव, विशाल क्षीरसागर, संतोष कदम, संतोष चोरगे, संदीप साळुंखे, जितेंद्र छाबडा,विक्रम जानुगडे,अमित देशमुख, नागनाथ मस्के, भावेश काच्या, अमित देशमुख, अमोल पाटील, गिरीश देशमुख, रामभाऊ बसवणे, अजित लायगुडे, रजत कडू, प्रवीण कदम, राजेश पाटील, योगेश गडवाणी, योगेश मोरे,कल्पेश हरणे, संजय कलगते, अभिराज वामन, अब्दुल शिकलगार, गणेश शर्मा, श्रीनिवास यादव, प्रताप धनावडे, मुजमिल खान, राजवर्धन कदम, भाग्येश मोरे, नितीन, नागुल आदी,उपस्थित होते.
—–
















