न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षेत यश संपादित केले आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.
दहावीच्या परीक्षेत कल्याणी खांदवे हिने ९३ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. यज्ञेश पाटील आणि महक मेराई यांनी ९२ टक्के गुण मिळवित्त संयुक्तपणे द्वितीय क्रमांक तर मिष्टी बनवारी हिने ८९ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला
या चमकदार कामगिरीबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काटे, संस्थेच्या उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई संदीप काटे, शाळेच्या प्राचार्या, शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.